हसा पण लठ्ठ होऊ नका

सदानंद हॉटेल. क्रॉफर्ड मार्केट येथील एक प्रसिद्ध हॉटेल. हॉटेलची सजावट अतीशय उत्तम. पदार्थही चवदार.पण तेथे एक मोठी समस्या मालकाला भेडसावत आहे. ती म्हणजे, तेथे लावलेली झाडे वाढतच नाहीत. आतां तुम्ही म्हणाल. " ती झाडे शोभेची असतील. प्लास्टीकची असतील " तर तसेही नाही. मी हात लावून पाहिले. अगदी सर्व झाडे, जिवंत, सशक्त आहेत.

कृपया त्या मालकाला मदत कराल का?

नाही जमणार? मी सांगतो.

" अहो! त्या हॉटेलमधे वाढायला भरपूर वेटर्स  आहेत. "

गुरुजी