मार्च २००५

तुला पाहिले...

कोसळताना, तुला पाहिले...
उभारताना, तुला पाहिले...

तगमग झाली, धरणीची अन्
आसुसताना, तुला पाहिले...

मेघ येइना, निरोप घेउन
आतुरताना, तुला पाहिले...

नदी आटली, कोंब फुटेना
पाझरताना, तुला पाहिले...

मोह दाटला, लज्जा सुटली
बावरताना, तुला पाहिले...

आशाकांक्षा, बुडू लागल्या
तरंगताना, तुला पाहिले...

सृजनशीलता, बोथट झाली
खळबळताना, तुला पाहिले...

प्रौढत्वाचा, पाश आवळे
बागडताना, तुला पाहिले...

कंठ दाटला, शब्द फुटेना
कुजबुजताना, तुला पाहिले...

चमकुन गेली, वीज अचानक
प्रकाशताना, तुला पाहिले...

'धीर धरी रे, सख्या प्रवासी'
सावरताना, तुला पाहिले...

Post to Feed

छान
अप्रतिम
वा!
क्या बात है...
वा प्रवासी!
खरेच आम्हीही, तुला पाह
अप्रतिम
'प्रेक्ष'णीय
कविता अन प्रतिसाद सगळे
उत्तम
सुंदर
अप्रतिम!
नतमस्तक
अप्रतीम
अफलातुन!!
"या सम हा"....
अनुताई, मंदारपंत, मृदु
सुंदर
छान!
सुंदर

Typing help hide