हसा पण लठ्ठ होऊ नका

श्री. गजाननरावाना बरे नव्हते. सौ. ठमाकाकू त्याना घेऊन डॉ. पोटदुखे यांजकडे घेऊन गेल्या. डॉ. नि तपासणी केली. आणि औषधाच्या पाच पुड्या बांधून दिल्या.

" हे औषध सकाळी झोपून उठल्यावर एक चमचा. हें औषध सकाळी चहा नंतर दोन चमचे. हें औषध दुपारी जेवणा अगोदर तीन चमचे. हें औषध दुपारी चहा बरोबर तीन चमचे. आणि हें औषध रात्री जेवणा अगोदर दोन चमचे." डॉक्टरानी समजाऊन सांगितले.

" धन्यवाद " गजाननराव म्हणाले.

" अहो ! धन्यवाद काय, एवढे चमचे आपल्याकडे आहेत काय ? " सौ. ठमाकाकू करवादल्या.

ग़ुरुजी