ऑगस्ट
१
२००७
"...भांड्याला भांडं लागायचंच,
त्यात काय मोठंसं?"
गुळगुळीत, क्लिशे बनलेलं वाक्य
बहुतेक क्लिशेंप्रमाणे सत्यावर आधारित
- काही प्रमाणात.
नसेलही त्यात काही मोठंसं
पण प्रत्येक वेळी भांड्याला पोचा येतोच
कधी लहान
कधी मोठा
पण कायमचा
भांड्याचा आकार बदलणारा,
विद्रूप करणारा.
पोच्यांची संख्या वाढत जाते
अपरिहार्यपणे
आणि एक दिवशी भांड्याचा मूळ आकार
ओळखू येईनासा होतो
अन् तरी हिंमत होत नाही
नवं भांडं घेण्याची...
नवे पोचे घेण्याची...
त्यात काय मोठंसं?"
गुळगुळीत, क्लिशे बनलेलं वाक्य
बहुतेक क्लिशेंप्रमाणे सत्यावर आधारित
- काही प्रमाणात.
नसेलही त्यात काही मोठंसं
पण प्रत्येक वेळी भांड्याला पोचा येतोच
कधी लहान
कधी मोठा
पण कायमचा
भांड्याचा आकार बदलणारा,
विद्रूप करणारा.
पोच्यांची संख्या वाढत जाते
अपरिहार्यपणे
आणि एक दिवशी भांड्याचा मूळ आकार
ओळखू येईनासा होतो
अन् तरी हिंमत होत नाही
नवं भांडं घेण्याची...
नवे पोचे घेण्याची...
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
बाप रे!
प्रे. श्रावण मोडक (बुध., ०१/०८/२००७ - ११:३१).
घेतलं भांडं नवं
प्रे. प्रियाली (बुध., ०१/०८/२००७ - ११:५९).
डिझाइन
प्रे. मीना कोळी (बुध., ०१/०८/२००७ - १३:२८).
चांगली
प्रे. जीवन जिज्ञासा (बुध., ०१/०८/२००७ - १४:१२).
अर्थपूर्ण
प्रे. मानस६ (बुध., ०१/०८/२००७ - १७:०१).
हम्म्म!
प्रे. प्राजु (बुध., ०१/०८/२००७ - १७:११).
सहमत
प्रे. स्मिता१ (गुरु., ०२/०८/२००७ - ०३:५०).
व्वा!
प्रे. चक्रपाणि (गुरु., ०२/०८/२००७ - ००:५०).
हेच..
प्रे. केशवसुमार (रवि., ०५/०८/२००७ - १८:५५).
दुसरा प्रतिसाद
प्रे. अद्वैतुल्लाखान (गुरु., ०९/०८/२००७ - १०:५७).
सूचकतेचे उत्तम उदाहरण
प्रे. प्रदीप कुलकर्णी (शुक्र., ०३/०८/२००७ - ११:३८).
शेवटची ओळ
प्रे. अद्वैतुल्लाखान (गुरु., ०९/०८/२००७ - ११:०२).
आभार
प्रे. मृण्मयी (रवि., ०५/०८/२००७ - ०२:०२).
वेगळी आणि मस्त
प्रे. ऋषिकेश दाभोळकर (रवि., ०५/०८/२००७ - २२:१८).
अस्वस्थ करणारी,खरी कविता!
प्रे. जयन्ता५२ (शुक्र., १०/०८/२००७ - १५:२४).