ऑगस्ट
६
२००७
दुःखाने कुठल्या समुद्र इतका हेलावतो सारखा ?
अश्रू का इतके पितो, खवळतो, खारावतो सारखा?
केव्हाचा खटल्यापरी गुदरतो आहेस तू जीवना ?
फिर्याद्यासम श्वासश्वास फिरतो, ठोठावतो सारखा
नाही ह्या दुनियेत मित्र अथवा वैरी मनासारखा
कोणी निर्दय एवढा न जपतो, जोजावतो सारखा
रक्ताने अमुच्या भिजून क्षितिजे तेजाळली येथली !
दर्पाने कसल्या प्रकाश इथला घोंघावतो सारखा ?
आभाळा, चमकून का निरखतो आहेस बाबा मला?
माझी झेप स्मरून मीच अजुनी भांबावतो सारखा !
भेटावा चकवा तसे दिवसही येतात भेटायला
आहे त्याच स्थळी अजून दुनिया, मी धावतो सारखा
"ये मागे परतून, खेळ अपुला मांडू नव्याने पुन्हा,"
माझ्यातील कुणी निरागस मला बोलावतो सारखा
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
व्वा!
प्रे. चक्रपाणि (सोम., ०६/०८/२००७ - ०८:३२).
चकवा
प्रे. मिलिंद फणसे (सोम., ०६/०८/२००७ - ०८:३८).
अतिशय आम
प्रे. चित्त (सोम., ०६/०८/२००७ - ०९:००).
पुन्हा , नव्याने , पुन्हा नव्याने
प्रे. जीवन जिज्ञासा (सोम., ०६/०८/२००७ - १२:३३).
सुंदर
प्रे. श्रावण मोडक (सोम., ०६/०८/२००७ - ०८:३९).
मरते हैं आरज़ू में मरने की....
प्रे. मानस६ (सोम., ०६/०८/२००७ - १०:५६).
वा!
प्रे. अजब (सोम., ०६/०८/२००७ - १०:५७).
जोरदार गझल
प्रे. प्रदीप कुलकर्णी (सोम., ०६/०८/२००७ - ११:१६).
हेच..
प्रे. केशवसुमार (सोम., ०६/०८/२००७ - ११:५३).
झकास
प्रे. विसुनाना (सोम., ०६/०८/२००७ - ११:५२).
धन्यवाद | एकाच वेळी
प्रे. चित्त (सोम., ०६/०८/२००७ - १२:०४).
वा!
प्रे. जीवन जिज्ञासा (सोम., ०६/०८/२००७ - १३:००).
धन्यवाद
प्रे. चित्त (सोम., ०६/०८/२००७ - १३:४४).
समजले
प्रे. जीवन जिज्ञासा (सोम., ०६/०८/२००७ - १४:४९).
आभार
प्रे. चित्त (बुध., ०८/०८/२००७ - ०५:२७).
सुंदर
प्रे. कुमार जावडेकर (बुध., ०८/०८/२००७ - १६:३२).
वा
प्रे. वरदा (गुरु., ०९/०८/२००७ - ०२:५२).
छान
प्रे. रोहिणी (गुरु., ०९/०८/२००७ - ०३:२१).
सहमत आहे
प्रे. अदिती (गुरु., ०९/०८/२००७ - ०७:२६).
मस्तच..!!
प्रे. बेभान (गुरु., ०९/०८/२००७ - १५:११).
खूप छान!
प्रे. छाया राजे (गुरु., ०९/०८/२००७ - २०:५०).