दमदार साहित्य लोकांना का आवडत नाही ???

माझी तक्रार नाही , हे माझं मत आहे. मी असणाऱ्या सर्व मतांचा आदर करून् चर्चेचा प्रस्ताव ठेवत आहे..

दमदार साहित्य लोकांना का आवडत नाही ???

माझ्यामते मी इथे प्रकाशित केलेले साहित्य खूप उच्च प्रतीचे आहे. (माझं मत चुकीचे असण्याची शक्यता जास्त वाटते. )जास्त नाही पण जे काही  आहे त्यावर खूप कमी प्रतिक्रिया आहेत. मला वाटत होतं , माझं साहित्य खूप दमदार आहे.  बऱ्याच गोष्टींवर खूप प्रतिक्रिया येतात पण चांगल्या साहित्यावर खूप कमी प्रतिक्रिया  येतात.

एक जमांना होता जेव्हा प्र. के. अत्रे, वि. स. खांडेकर , ना. सी. फडके मराठी जनमनावर राज्य करायचे. आता जमांना बदललाय काय ??

दु:ख बदललीत काय ? आपण जास्त सुखी झालोय काय ?

` मनोगत ` खूप छान व्यासपीठ आहे. मला इथे रेंगाळायला आवडतं. पण हल्ली वाटतं हलक्या विषयावर लोकं जास्त रमतात.

अर्थात हा ज्याच त्याचा प्रश्न आहे, हे मान्य करूनही , असं का होतं हे शोधण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.

आपली मते प्राजंळपणे मांडावीत , ही विनंती ..