फिश कटलेट

  • १ रावस किंव्हा सुरमई (मद्यम)
  • १/२"आलं- ४/५ लसुण-४ हिरवी मिरची, कोथिंबीरची जाडसर पेस्ट,
  • १/२ वाटी चिंचेचे पाणी, ब्रेड ३ ते ४ स्लाईस, १ बटाटा उकडलेला.
  • १ मोठा चमचा धणेपूड, चवीपुरते मिठ.
३० मिनिटे
२ जणांसाठी

मासा स्वच्छ धुवून घेवुन कातडी व काटे काढुन टाकावेत, नंतर पाण्यात उकडून कुस्करून घ्यावा. पावाच्या कडाकाढून पाण्यात थोडा भिजवुन घ्यावा. आता मासा चिंचेच्या पाण्यात घोळवून  घ्यावा.  धणेपूड, आलं-लसुण-मिरची, कोथिंबीरची पेस्ट लावून त्यात पाव (लगदा) आणि उकडलेला बटाटा कुस्करावा. मिश्रण जाडसर असावे. नंतर मिठ घालुन छोट्या चपट्या वड्या बनवाव्यात. शेवटी खरपुस तळून गरम गरम वाढाव्यात.

नुसत्या वरण-भाता सोबत झकास लागतात.

सध्या श्रावण चालु आहे लक्षात असुदे......   

स्वैंपाक घरातील माझ्या उचापती.