चतुरा

वनविहारासाठी गेलेल्या एका तरुणीला वनात, जाळ्यात अडकलेला एक बेडूक दिसला.
तिला त्याची दया आली व तिने त्याला मुक्त केले.
मुक्त होताच तो मनुष्य वाणीने बोलू लागला.
"हे स्त्रिये ! मी केवळ एक बेडूक नसून एक शापित गंधर्व आहे.
 आज तू माझी मुक्तता केलीस. कृतज्ञता स्वरूप मी तुझ्या तीन इच्छा पूर्ण करू शकतो.
 काय हवे ते माग. मात्र एक लक्षात असूं दे, तुला जे कांही मिळेल ते तुझ्या पतीला दसपट मिळेल."

ती तरुणी म्हणाली, " मला अप्रतिम सौंदय दे."

तो गंधर्व म्हणाला, " पण तुझा पति तुझ्यापेक्षा दसपट रुबाबदार होईल."

ती म्हणाली, " चालेल."

तिची एक इच्छा मान्य झाली.

दुसऱ्या इच्छेने तिने दहा कोटी रुपये मागितले.

दुसरी इच्छा मान्य झाली.

गंधर्व म्हणाला " आता तिसरी आणि शेवटची इच्छा. नीट विचार करून माग."

तरुणीने क्षणाचाही विचार न करता मागितले,

" मला एक सौम्य हृदयविकाराचा झटका दे."

(हा विनोद असाच जालावरून उचललेला आहे)
(विनंती महिला वचकांना : हा विनोदच आहे. हलकेच घ्या.)