लग्नाआधी......नन्तर....

लग्नाआधी शब्द वेगळे,
नंतर कळती अर्थ वेगळे....

आधी...रेशमी तुझे केस मोकळे,

जीव कसा गं त्यात गुंतला।

नंतर...घासाघासात गुंतवळ आहे,

बांधून ठेव तुझ्या कुंतला।

आधी...तू आल्याची वर्दी देतो,

तुझ्या अंगीचा गंध आगळा,

नंतर...परफ्युमचा तो खर्च केवढा,

बघुनी माझा प्राण ये गळा।

आधी...तू बोलावे,मी ऐकावे,

अनंतकाळ असेच व्हावे।

नंतर...किती वटवट ऐकू तुझी मी,

वाटे येथूनी पळून जावे।

आधी...साखरेवीणही चहास गोडी,

तुझ्या हातची जादुच न कळे।

नंतर...अगोड चहा पिऊ कसा मी,

लक्ष्य कुठे ते तुझे वेंधळे।

आधी...तंग तुझ्या त्या कपड्यामधुनी,

तारुण्य तुझे घे नजर खेचूनी।

नंतर...असले कपडे देतो फेकूनी,

साडीच ये पटकन नेसूनी।

आधी...कोमल हळवी प्रिया तू सुंदर,

फुलासारखे जपीन खरोखर।

नंतर.. किती जीवाचे कौतुक करशील

मुकाट मलम लाव जखमेवर।

आधी...पाऊल ठेवूस नको मातीवर,

मलीन होईल हे कोमल सुंदर।

नंतर...पुरेत नखरे,ये भानावर,

पदर खोच अन झाडलोट कर।

आधी...या जन्मीचा दास तुझा मी,

राणी असशी तूच खरोखर।

नंतर...माझ्या घरचा राजा मी तर,

जसे मी सांगीन,तस