चटपटी चटणी

  • पूदिना १ जूडी
  • कोथिम्बीर १ जूडी
  • कढीपत्ता १०/१२ पाने
  • हीरव्या मिरच्या २
  • लिम्बू १
  • मीठ , साखर चवीप्रमाणे
१५ मिनिटे
३/४

प्रथम पुदिन्याची पाने ,कोथिंबीर पाने, कढीपत्ता पाने निवडून स्वच्छ धुऊन घ्या.. आता मिक्सरच्या भांड्यात ही सारी पाने आणि मिरच्या तसंच मीठ साखर एकत्र लिंबाच्या रसात वरून थोडेही पाणी न घालता वाटून घ्या..

लिंबाच्या रसातच वाटल्यामुळे मस्त चव येते... सॅंडविच मध्ये किंवा जेवताना ही तोंडि लावणे म्हणून एकदम टेस्टी...  

लहान मूले खाणार असतील तर एखादीच मिर्चि घालावी..पूदिन्यामूळे एक वेगळीच मस्त चव येते..

स्वत: केलेला आणि यशस्वी ठरलेला प्रयत्न