'उपवासातील आहार?' माहिती हवी आहे.

सध्या धकाधकीच्या जीवनात उपवासाचे महत्त्व कमी झालेले नाही. बराचसा मराठी वर्ग हा श्रद्दाळू आहे. सर्वच उपवास करीत नसले तरी बहुतेकांना आप्तां खातर उपवास घडतो तर काही आवडीने व श्रद्देने करतात. माझ्या शंका ह्या आहारावर आहेत. कारण बऱ्याच लोकात ह्या बाबत दुमत आहे.

उपावासात कोणते पदार्थ वर्ज आहेत?  चहा चालतो म्हणता तर आलं/ वेलदोडा घालुन चालेल? ख़िचडीत काही लोक जीरे, मिरची घलतात ते चालेल का? सर्वच प्रकारचा सुका मेवा चालतो का (किशमिश)? ऊपवास सोडताना ताटावाटे उजव्याबाजुने पाणी सोडतात. जेवुन झाल्यावर ताटात पाणी सोडणे योग्य आहे का? जेवताना बैठक हलुद्यायची नसते म्हणे. पहीला घास भाताचा असावा म्हणतात, तो वरण घालुन की दही धालुन? जेवणात वांगी, अळंबी, सुरण चालत नाही खरे आहे का? अजुन अशा कोणत्या भाज्या चालत नाहीत? बरं उपावास सोडल्यावर मुखशुद्दी बडीशेप वगैरे? अजुनही माझ्याकडुन बरंच सुटले असल्याची शक्यता आहे.

आता इथे मर्यादेचा भाग निच्छित येईल म्हणा. ज्याच्या घरी जे चालत आहे तेच तो पाळणार हे सांगायला नको पण तरी ह्या माहिती बाबत बरीच उत्सुकता आहे आणि कारणे मिळतील तर झकासच.