ताज्या मसाल्याचे सांबार घरच्या घरी

  • १.तुरडाळ,तांदुळ,उडीदडाळ प्रत्येकी १ चमचा.
  • २. जिरे १ च.,धणे २ च.,मेथ्या १/२ च.,मोहरी १/२ च.,
  • ३.दालचिनी १ इंच,२-४ काळी मिरी,२-४ लवंगा,
  • ४.कढिपत्ता मुठभर,लसुण पाकळ्या १०-१२.
  • ५.ओलं खोबरं ५ चमचे,गरम मसाला १/२ च.,
  • ६. लाल तिखट,मीठ,हळद,हिंग,चिंच,गुळ,कोथिंबीर...
  • शिजवलेली तुरडाळ,
  • सांबारात घालायला आपल्या आवडीच्या भाज्या (उभा चिरलेला कांदा,टोमाटो,बटाटा,वांगं,शेवग्याच्या शेंगा)
३० मिनिटे
४ जणांसाठी...

कृती :

१ ते ४ मधले सर्व पदार्थ थोड्याश्या तेलावर भाजुन घ्यावे.

त्यात उरलेले पदार्थ घालुन मिक्सरमधे बारीक वाटुन घ्यावे....

हा ओला मसाला तेलावर खरपुस परतुन त्यात शिजवलेली तुरडाळ ,आपल्या आवडीच्या भाज्या घालुन सांबार करावे...

गरमागरम इडलीसोबत खावे...

हा मसाला झटपट होतो.. आणि ताज्या ताज्या मसाल्याचे सांबार मस्त लागते...

मेथ्या व मोहरी मोजुन १/२ सपाट चमचा वापरावे.. नाहीतर कडवट लागेल... 

आईची मैत्रिण - शेट्टी काकु.