एका दिवसाचे स्वप्न

एक दिवस किरण व्हावे
धरती आकाशावर पसरावे

एक दिवस थेंब व्हावे
शिंपल्यात बसून मोती व्हावे

एक दिवस पवन व्हावे
अदृश्य रुपे मुक्त हिंडावे

एक दिवस परागकण व्हावे
फुलाच्या सहवासात सुगंधी व्हावे

एक दिवस फुल व्हावे
ईश्वर मूर्तीची पूजा व्हावे