तांदळाची बोरं

  • २ वाट्या तांदुळ
  • अर्धी वाटी ओले खोबरे
  • अर्धी वाटी गुळ
  • चिमटीभर मीठ
  • तळण्यासाठी तेल
  • १ मोठा चमचा तीळ
३० मिनिटे
४-५ जणांसाठी

तांदुळ धुवून भिजत घालावे दुसऱ्या दिवशी उपसून एका कपड्यावर पसरून वाळू द्यावे. थॉदासा ओलसर पणाअसतानाच ते मंद गॅस्वर गुलाबी रंगावर भाजावे. नंतर मिक्सर मधून त्याचे बारीक पीठ करून घ्यावे.

एका थाळीत गुळ व खोबरे एकत्र करून चांगले एकजीव करावे . तीळ व चवीला चिमुटभर मीठ घालावे. त्यातच तांदळाची पीठी घालून मळून घ्यावे.

आता ह्या पीठाच्या बोरांच्या आकाराच्या गोळ्या कराव्या. तेलात सोनेरी रंगावर तळून घ्याव्या.

ह्यामधे पाणी दुध असे काही कालवताना वापरू नये. त्यामुळे ती मऊ पडून चिवट होतील. खोबरे गुळाच्या पातळ मिश्रणात जेवढे पीठ मावेल तितके हळू हळू घालात पीठ मळावे.

हा कोंकणी पदार्थ आहे. सणावाराला विषेशत: कृष्णजन्माष्टमीला आमच्याकडे नैवेद्याला करतात.

३-४ दिवस ही बोरं टिकतात त्यामुळे आधी करून ठेवता येतात. दिवाळीत पण फराळात करता येतील.

सासरची पद्धत