पालकाच्या काड्यांची चटणी

  • पालकाच्या काड्या - १ कप
  • डालवं -१/४ कप
  • दही - १/२ कप
  • हिरव्या मिरच्या -४-५
  • जीरे -१ चमचा
  • तेल -२ चमचे, मीठ चविपुरते
१५ मिनिटे
४-५
  • प्रथम पालकाच्या काड्या धूउन चिरून घ्याव्यात
  • तव्यावर तेल गरम करून त्यात जीरे टाकावेत
  • जीरे फुटल्यावर हिरवी मिरची टाकावी.
  • नंतर पालकाच्या काड्या टाकून परतून घ्यावे.
  • मिक्सर मध्ये वरील सगळे मिश्रण, दही, मीठ टाकून बारीक करावे

तव्यावर मिरचीचा ठसका उठतो आणि मिरची उडते त्यामुळे सांभाळून करावे

माझी ताई