रस्सम

  • टोमॅटो -२
  • लाल गोल मिरच्या-३-४
  • ऱस्सम पावडर - १ चमचा
  • चिंच - १ इंच
  • चांगले तुप -१-२ चमचा
  • मेथ्या ४-५ दाणे
  • हिंग, जीरे
  • गूळ -२ चमचा
  • वरणाचे पाणी -१ वाटी
  • लसणाच्या पाकळ्या -४-५
  • कडीपत्ता - ६-७ पाने
  • कोथिंबीर
४५ मिनिटे
३-४
  1. चिंच भिजवून घ्या
  2. टोमॅटो उकडून घ्या
  3. टोमॅटोची साल काढून मिक्सर मधून बारीक करून घ्या
  4. २ वाटी पाण्यात टोमॅटोचा रस आणि चिंचेचे पाणी मिसळून घ्यावे.
  5. त्यात रस्सम पावडर टाकावी.
  6. चांगले तूप गरम करून त्यात जीरे,वाटलेला लसण, मेथ्यांचे दाणे, कडीपत्ता, लाल मिरची, कोथिंबीर व हिंग टाकावे.
  7. फोडणीत मिश्रण टाकून मीठ व गूळ टाकावे
  8. उकळत आल्यावर वरणाचे पाणी टाकावे.

टोमॅटोच्या अंबटपणा वरून गुळाचे प्रमाण कमी जास्त करावे

माझी ताई