घावन घाटले

  • घाटल्यासाठी:१ वाटी कणिक,१ चमचा तूप,१ वाटी ओल्या नारळाचा चव,३/४वाटी गूळ
  • २ कप दूध+ साधारण १ कप दूध, वेलची,जायफळ स्वादासाठी, बदाम
  • घावनासाठी: २ वाट्या तांदूळाचे पीठ+ चवीपुरते मीठ
४५ मिनिटे
२ जणांना

घाटले: कणिक तूपावर गुलाबी रंगावर भाजून घ्या,त्यावर खोबरे घालून थोडे अजून भाजा,गूळ घाला आणि थोडे भाजा,दूध घालून चांगले शिजवा.शिजल्यावर त्यात बदाम,वेलची,जायफळ घाला व ढवळा.
हे घाटले तयार झाले.यातील दूध लवकर आळते आणि मिश्रण घट्ट होते ,त्यामुळे वाढायच्या आधी १/२ ते १ कप दूध घाला व खिरीसारखे सरसरीत मिश्रण करा.दूध घातल्याने अगोड वाटल्यास थोडी साखर/गूळ घाला.(परंतु गूळ चटकन विरघळत नाही.)

घावने: तांदळाची पिठी पाणी व चवीपुरते मीठ घालून घावनाला/धिरड्यांना भिजवतो तसे  भिजवा,१०/१५ मिनिटे ठेवा.तवा चांगला तापवून घावने घाला.घाटल्याबरोबर खा.

गणपतीगौरी आले की गौरीजेवणाला कोकणास्थांकडे घावन घाटले असते.

सौ.आई