झटपट डोसा

  • २ कप रवा,१/२ तान्दूळाचे पीठ,पाव कप बेसन
  • चार मिरच्या बारिक कापलेल्या,२/३ लसूण पाकळ्या ठेचून,बारिक चिरलेल आल,
  • कोथिम्बीर,अर्धा कप ओल्या नारळाचा कीस,१ बारिक चिरलेला कान्दा,
  • थोडे तेल, ४ कप आम्बट ताक (नसल्यास पाणी चालेल)
१५ मिनिटे
२ जणान्साठी

आधी रवा आणि बेसन वेगवेगळे भाजून घ्या..एका भांड्यात दोन्ही एकत्र करा..त्यात  तांदुळाचे पीठ घाला..त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या , आले, लसूण,किसलेला नारळ कोथिंबीर आणि आणि कांदा घाला..

आता त्यात पाणी किंवा ताक घाला. नीट मिक्स करा. आता तवा गरम झाल्यावर थोडे तेल घालून हे रव्याचे मिश्रण घाला.. डोश्याचा आकार द्या. काही मिनीटान्साठी झाकून ठेवा. आता उलटवून दुसऱ्या बाजूला पण शिजवून घ्या. नाश्त्याचा एक छान प्रकार झटपट बनतो..

तुमच्या आवडीप्रमाणे चटणी बरोबर किंवा केचप बरोबर खायला द्या .

रवा, बेसन आणि तांदुळाचे पीठ हे सारे वेगवेगळे भाजून बाटलीत भरून ठेवता येतात म्हणजे डोसे कधीही पटकन करता येतात..

ताई