खजुराची बर्फ़ी

  • २० खजुर
  • ८-१० बदाम
  • ८-१० काजू
  • १०-१२ बेदाणे
  • ४ मोठे चमचे- डिंक (तळलेला)
  • २- मोठे चमचे - साजुक तूप
  • चांदीचा वर्ख
३० मिनिटे
१० वड्या

१. कढईत तूप घालून त्यात बदामाचे काप परतून बाजूला काढून घ्यावेत.

२. नंतर त्याच तुपात खजुराचे तुकडे परतून घ्यावेत.

३. एका भांड्यात परतलेले बदामाचे काप, खजुराचे तुकडे, काजूचे तुकडे, बेदाणे व टळून कुस्करलेला डिंक एकत्र करून छान मळून घ्यावे.

४. तयार मिश्रणाला लांबट आकार देऊन वड्या पाडाव्या अथवा आवडी प्रमाणे आकार द्यावा.

५. ह्या वड्या २० ते २५ मिनिटे फ्रीज मध्ये सेट कराव्या.

६. तयार वड्यांना चांदीचा वर्ख लावून सजवावे.

हा पदार्थ उपवासाला तसेच मधुमेह रुग्णान्ना चालतो.

सुनिल बर्वे- आम्ही सारे खवय्ये- झी मराठी