पुणे - कुठे काय खावे......

मला माहिती नाही की हा विषय ह्या आधी चर्चिला गेला आहे की नाही ते. मी इथे पुण्यात कुठे काय खायला चांगल मिळतं ते सांगतो.  कृपया तुम्हीपण तुम्हाला माहित असलेली खास ठिकाण नमूद करा.

  • बिपीन स्नॅक्स, गरवारे कॉलेज समोर, कर्वे रोड.

          शिरा, पोहे, उपमा, खिचडी/खिचडी-काकडी, वडा पाव, पाव-पॅटिस, चहा.

  • दुर्गा कॅफे, पौड रोड

          कोल्ड कॉफी (रु. ८/-), अंडा भुर्जी, हाफ़ फ़्राय

  • ज्युस वर्ल्ड, ईस्ट स्ट्रीट

           नावावरुनच लक्षात येईल.  सिताफळ पल्प खुपच छान.

  • कोकण एक्स्प्रेस, डहाणुकर कॉलनी

          नॉन-व्हेज साठी प्रसिद्ध. मासे चांगले मिळतात.

  • आईसक्रीम-मॅजिक, करिष्मा सोसायटी, कोथरूड

          खास करून: कॅडबरी मिल्कशेक

  •  मानकर डोसा, एरंडवणे पोलिस स्टेशन जवळ

            सर्व प्रकारचे डोसे आणि उत्तपे.

  • चिवडेवाला, अप्पा बळवंत चौक (पुस्तकांची दुकान संपल्यानंतर लगेच)

  • मनोहर स्नॅक्स, मेहेंदळे गॅरेज. कोथरूड.

           घरगुती जेवण छान मिळतं.