ऑक्टोबर १० २००७

लाल मेथी-मटर-मलाई

जिन्नस

  • २ जुड्या मेथी, २ मोठे कांदे, २-३ छोटे डबे टोमेटो प्यूरी.
  • आलं-लसुण पेस्ट २ चमचे, २-३ वाट्या मटर, १ छोटा डबा मलाई
  • बटर , २ चमचे तिखट, १ चमचा गरम मसाला, मीठ, साखर, हळद
  • सजावटी साठी कोथींबीर व थोडी मलाई

मार्गदर्शन

प्रथम कांदा आलं-लसूण वाटून घ्यावे . मेथी धुऊन चिरून घ्यावी.

कढई तापत ठेवून बटर घालावे. मग थोडी साखर घालावी. ती लाल झाली की कांदा आलं-लसूण वाटण

घालावे. ५ मी. परतावं, हळद, तिखट घालावे.

मेथी,मटार घालून शिजू द्यावे. टोमॅटो प्यूरी घालावी. परत ५ मि. शिजू द्यावे.

लागेल तसं पाणी घालावे. मीठ, गरम मसाला घालावा.

शेवटी मलई घालून उकळावे.

वाढण्याच्या भांड्या मध्ये काढून, कोथींबीर व मलई ने सजवावे. 

टीपा

नान व जीरा राईस बरोबर खावे.

माहितीचा स्रोत

माझी बहीण- सौ. वर्षा पटवर्धन

Post to Feedमस्त

Typing help hide