मग तळलेले शेंगदाणे , पिट्टा ब्रेडचा चुरा, व चवीनुसार मीठ, साखर त्यात घालावे. एक वाफ आणावी.
लिंबू पिळावे. कोथिंबीरीने सजवावे.
फोडणीच्या पोळीसारखंच दह्याबरोबर मस्त लागतो हा पदार्थ.
ज्यांना फोडणीची पोळी, भाकरी आवडते पण देशाबाहेर असल्याने मिळत नाही त्यांनी जरुर करा. देशाबाहेर असलो आणि नोकरीही करत असलो की आवश्यक तेवढ्याच पोळ्या केल्या जातात. मग पोळ्या ऊरल्या म्हणून फोडणीची पॉळी कधी करणार. म्हणून हा त्यातल्या जवळ जाणारा पर्याय.
पोहे करायची सवय असतेच. त्यामुळे एकट्या राहण्यार्या पुरुषांना देखील जमेल हे करायला.
स्वत:चे प्रयोग
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.