ब्रोकोलीची भजी

  • ब्रोकोली - १/२ पाउन्ड
  • बेसन, बेकिन्ग पावडर
  • आले-लसून - भरड पेस्ट
  • तळण्यासाठी तेल
  • अर्धा लीम्बू , मीठ, हिरवी मिरची, कोथिम्बीर
  • जीरे, ओवा, हिन्ग
३० मिनिटे
३ जणांसाठी

१. ब्रोकोलीचे एक इंचांचे तुकडे करून, धुऊन घ्या. नंतर, मीठ आणि लिंबूरस लावून १० मिनिटे ठेवून द्या.

२. दरम्यान, बेसनामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून पातळसर भिजवा. त्यामध्ये, बारीक चिरलेली कोथिंबीर, ओवा, जिरे, मीठ, हिरवी मिरची, हिंग आणि २ छोटे चमचे तेल घालून मिश्रण एकजीव करा.

३. वरील  ब्रोकोलीला  आले-लसूण पेस्ट लवून आणखी १० मिनिटे ठेवा.

४. हे ब्रोकोलीचे तुकडे एक एक करून बेसनच्या मिश्रणात बुडवून तेलामध्ये तळून घ्या

१. हिरव्या चटणी बरोबर छान लागतात. (करत, करत खाताना संपली नाहीत तर :-))

२. हिरव्या मिरच्या आणि आले-लसूण कापून घालण्या ऐवजी ठेचून घातल्या तर आणखी चव येते.

३. इतर पदार्थ (मीठ, मिरची, ओवा, वगैरे) आवडीप्रमाणे/ चवीप्रमाणे/ इच्छेप्रमाणे/ अनुभवाप्रमाणे  घ्यावेत.

4. ही भजी अत्यंत चवदार लागतात, त्यामुळे एकदा करून बघाच. :-)

मैत्रिणीन्च्या चर्चा