स्वीटकॉर्नची स्वीटपुरी

  • अर्धी वाटी स्वीटकॉर्नचे दाणे
  • पाव वाटी गूळ
  • कणिक
  • २ चमचे ड्राय फ्रुट्चा चुरा
  • तळण्यापुरते तेल
  • वेलचीपूड अर्धा चमचा
१५ मिनिटे
३ जणांची
  1. स्वीटकॉर्नचे दाणे मिक्सरमध्ये बारीक करावे.
  2. त्यातले हाताने पिळून थोडे पाणी काढून टाकावे.
  3. त्यात किसलेला गूळ घालावा.
  4. ड्रायफ्रुटचा चुरा, वेलचीपूड घालावी.
  5. त्यात बसेल तितकी कणीक घालावी.
  6. मिश्रण लाटण्यापुरते घट्ट असावे.
  7. पुऱ्या नेहमीसारख्या लाटून रिफाइंड तेलात तळाव्या.

पुऱ्या खूप वेळ तळू नयेत, कडक होतात, जुजबी तळून काढाव्यात.
या पुऱ्या फुगत नाहीत.
जेवणाबरोबर गरम चांगल्या लागतात.

मी स्वतः प्रयोग करुन शोधलेली पाककृती.