ओट फ्लेक्सची बिस्किटे

  • २५० ग्राम ओट फ्लेक्स,२०० ग्राम बटर,१२५ ग्राम साखर,
  • १२५ ग्राम मैदा,२ टीस्पून बेकिंग पावडर,१ अंडे,१चिमूट मीठ
  • वॅनिला अर्क १.५ चमचा
४५ मिनिटे
३५,४० मध्यम आकाराची बिस्किटे होतात

मैदा+बेकिंग पावडर+१ चिमूट मीठ एकत्र करणे.बटर गरम करम करणे,त्यात हा बे.पा.+मीठ घातलेला मैदा घालणे, ओटफ्लेक्स घालणे,अंडे फोडून घालणे,वॅनिला अर्क व साखर घालणे व सगळे मिश्रण एकत्र करणे‌.
बेकिंग ट्रे मध्ये बेकिंग पेपर ठेवणे.या मिश्रणाचे अंतराअंतरावर मध्यम आकाराचे  सांडगे घालणे.

१८० ते २०० अंश सेंटीग्रेड तापमानावर साधारण २० मिनिटे बेक करणे.

१.दोन बिस्किटात अंतर ठेवावे कारण बेकिंग पावडर असल्याने बिस्किटे फुलतात आणि अंतर नसेल तर एकमेकांना चिकटतात.
२.बिस्किटे तयार झाली की अवन मधून  एका ट्रेमध्ये/ ताटामध्ये  काढून घेणे व पूर्ण गार झाली की डब्यात भरणे अन्यथा वाफ धरून बिस्किटे मऊ पडतात.

त्सेंटा आजी