हरबऱ्याच्या डाळीचे लाडू

  • हरबरा डाळ - १ वाटी
  • साखर - १ ते सव्वा वाटी
  • नारळ खवलेला - पाऊण वाटी
  • तूप -६-७ चमचे
  • दूध - १/२ वाटी
  • काजु, बदाम, पिस्ता यांचे काप
  • विलायची पुड -१ चमचा
  • केशरपूड
३० मिनिटे
७-८ लाडू

1. हरबऱ्याची डाळ ४-५ तास भिजवून ठेवावी.

 2. मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावी.

3. कढईत तूप गरम करून वाटलेली डाळ गोल्डन ब्राउन होई पर्यंत परतून घ्यावी.

4. डाळ परतल्यावर त्यात नारळ आणि दूध घालून परतावे.

 5. दुसऱ्या पातेल्यात साखर घेवुन त्यात ३-४ चमचे पाणी घालून २ तारी पाक करावा.

 6. त्यात सर्व ड्राय फ़्रुटस, विलयची आणि केशरपूड घालावी.

7. परतलेली डाळ पाकात घालावी आणि ढवळावी.

८. गार झाल्यावर लाडू वळावे

लाडू दोन दिवसांनी पाक मुरल्यावर जास्त छान लागतात.

वैदेही