ऑक्टोबर
१७
२००७
कारा अभेद्य जेथे मी बंदिवान आहे
आहे तुरुंग काया, मन अंदमान आहे
आयुष्य रोज भरते पेले हलाहलाचे
तेही हसून प्यावे ह्याच्यात शान आहे
नशिबास कोसुनी का सुरई जवळ करावी?
जो नीळकंठ होतो त्यालाच मान आहे
आश्चर्य काय ह्याचे की मी पशू निघालो?
खोलात माणसाच्या घनदाट रान आहे
वर्दी नव्या युगाची जे आरवीत होते
नशिबात कोंबड्यांच्या त्या कंठस्नान आहे
सरकारमान्य गाथा स्वातंत्र्यसंगराची
कादंबरी, म्हणावे, देदीप्यमान आहे
उपयोग काय त्याच्या ह्या वांझ उगवण्याचा?
काळोख वाटणारा तो अंशुमान आहे
गातात भाट-चारण संपादकीय गाणी
तख्तावरील राजा बहुधा महान आहे !
अमुचा विठू निराळा, दिंडी असे निराळी
वारी कुबेरघरची हे वर्तमान आहे
विद्यार्जनार्थ आलो मी कोणत्या ठिकाणी?
येथे सरस्वतीचे सजले दुकान आहे
प्रत्येक चीज आहे हल्ली जगी विकाऊ
अपवाद ह्यास कोठे माझे इमान आहे?
मीही लिलाव केला शब्दांत वेदनांचा
परदु:ख पण जगाला कवडीसमान आहे
बोलावले न त्याने, गेलो न दर्शनाला
नास्तिक्य हे न दोस्ता, हा स्वाभिमान आहे
मी काय त्यास देऊ, त्याचेच सर्व काही
देण्यास फक्त हाती हे अर्घ्यदान आहे
यंदाच्या मनोगत दिवाळी अंकासाठी आपले उत्तमोत्तम लेखन पाठवणार आहात ना?
आहे तुरुंग काया, मन अंदमान आहे
आयुष्य रोज भरते पेले हलाहलाचे
तेही हसून प्यावे ह्याच्यात शान आहे
नशिबास कोसुनी का सुरई जवळ करावी?
जो नीळकंठ होतो त्यालाच मान आहे
आश्चर्य काय ह्याचे की मी पशू निघालो?
खोलात माणसाच्या घनदाट रान आहे
वर्दी नव्या युगाची जे आरवीत होते
नशिबात कोंबड्यांच्या त्या कंठस्नान आहे
सरकारमान्य गाथा स्वातंत्र्यसंगराची
कादंबरी, म्हणावे, देदीप्यमान आहे
उपयोग काय त्याच्या ह्या वांझ उगवण्याचा?
काळोख वाटणारा तो अंशुमान आहे
गातात भाट-चारण संपादकीय गाणी
तख्तावरील राजा बहुधा महान आहे !
अमुचा विठू निराळा, दिंडी असे निराळी
वारी कुबेरघरची हे वर्तमान आहे
विद्यार्जनार्थ आलो मी कोणत्या ठिकाणी?
येथे सरस्वतीचे सजले दुकान आहे
प्रत्येक चीज आहे हल्ली जगी विकाऊ
अपवाद ह्यास कोठे माझे इमान आहे?
मीही लिलाव केला शब्दांत वेदनांचा
परदु:ख पण जगाला कवडीसमान आहे
बोलावले न त्याने, गेलो न दर्शनाला
नास्तिक्य हे न दोस्ता, हा स्वाभिमान आहे
मी काय त्यास देऊ, त्याचेच सर्व काही
देण्यास फक्त हाती हे अर्घ्यदान आहे
यंदाच्या मनोगत दिवाळी अंकासाठी आपले उत्तमोत्तम लेखन पाठवणार आहात ना?- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
अप्रतिम!
प्रे. बकुळ (बुध., १७/१०/२००७ - ११:४२).
आश्चर्य काय ह्याचे की मी पशू निघालो?
प्रे. मानस६ (बुध., १७/१०/२००७ - ११:५५).
छान
प्रे. अर्चना देशकर (बुध., १७/१०/२००७ - १२:२५).
छान
प्रे. जीवन जिज्ञासा (बुध., १७/१०/२००७ - १२:३६).
वा!
प्रे. पुलस्ति (बुध., १७/१०/२००७ - १३:३५).
अप्रतिम
प्रे. सर्वसाक्षी (बुध., १७/१०/२००७ - १५:४४).
झकास!
प्रे. ऋषिकेश दाभोळकर (बुध., १७/१०/२००७ - १६:१६).
जोरदार...
प्रे. प्रदीप कुलकर्णी (बुध., १७/१०/२००७ - १७:२३).
श्रीमंत गजल
प्रे. प्रमोद बेजकर (बुध., १७/१०/२००७ - १७:४४).
वा वा
प्रे. अदिती (बुध., १७/१०/२००७ - १७:४९).
जोरदार...
प्रे. प्रदीप कुलकर्णी (बुध., १७/१०/२००७ - १७:५३).
हेच
प्रे. केशवसुमार (गुरु., १८/१०/२००७ - ०१:३५).
हा स्वाभिमान आहे
प्रे. चित्त (बुध., १७/१०/२००७ - २२:५१).
व्वा! मस्तच!!
प्रे. चक्रपाणि (गुरु., १८/१०/२००७ - ०२:३७).
असेच
प्रे. नंदन (गुरु., १८/१०/२००७ - ०६:०२).
अतिशय सुंदर...
प्रे. आरती सुदाम कदम (गुरु., १८/१०/२००७ - ०५:१४).
देदिप्यमान गझल
प्रे. विसुनाना (गुरु., १८/१०/२००७ - ०७:३०).
असमाधानी
प्रे. बालोबा (गुरु., १८/१०/२००७ - ०८:४५).
चमकदार
प्रे. कुशाग्र (शुक्र., १९/१०/२००७ - २२:५२).
वा!
प्रे. अजब (शनि., २०/१०/२००७ - ०३:०४).
सुरेख
प्रे. कामिनी केंभावी (शनि., २०/१०/२००७ - १२:४८).
अपवाद ह्यास कोठे
प्रे. जयन्ता५२ (मंगळ., २३/१०/२००७ - ०५:३०).
वा!
प्रे. कुमार जावडेकर (मंगळ., ३०/१०/२००७ - १३:१६).
अतिशय सुंदर
प्रे. शरद रेशमेय (शनि., १७/११/२००७ - १६:४२).
क्या बात है
प्रे. ॐ (मंगळ., १८/१२/२००७ - ०४:०८).
क्या बात है
प्रे. ॐ (मंगळ., १८/१२/२००७ - ०४:०८).
