ऑक्टोबर १८ २००७

पत्ता कोबी चे पराठे

जिन्नस

  • कणीक,
  • १ पाव पत्ता कोबी किसलेला
  • आलं लसुण मिरची पेस्ट

मार्गदर्शन

पराठे:
कणीक, तेल, मीठ
सारण: १ पाव पत्ता कोबी किसलेला
बडीशोप, आलं लसूण मिरची पेस्ट, चण्याचे पीठ, हिंग, कोथिंबीर

कणके मध्ये तेल आणि मीठ घालून थोडं सैल भिजवावे फार सैल पण नको.

१ चमचा तेला मध्ये बडीशोप, हिंग आणि आलं लसूण मिरची पेस्ट टाकावी. मग त्यात कोबी टाकवा. मीठ घालून परतावे. आणि मग कोबी शिजल्यावर पाणी सुटेल. मग त्यात मावेल तितके चण्याचे पीठ टाकावे. पीठ आधी भाजलेले असेल तर उत्तम. ह्या सारणाचे गोळे करून ते कणकेत भरावे. व पुरणपोळी सारखे लाटून तेलावर परतून घेणे.
गरम गरम पराठा आणी जोडीला दही आणि १ फळ.
पुरी च्या आकाराचे पराठे केले तर ते कचोरी सारखे दिसतात आणी लहान मुले आवडीने खातात.

टीपा

पुरी च्या आकाराचे पराठे केले तर ते कचोरी सारखे दिसतात आणी लहान मुले आवडीने खातात.

माहितीचा स्रोत

आई

Post to Feedमस्त !
कचोरी

Typing help hide