पालकाचे पराठे

  • पालक -१ कप
  • कणीक -३/४ कप
  • बेसन -१/४ कप
  • लसूण - ३-४ पाकळ्या (पेस्ट)
  • जीरे पुड -१ छोटा चमचा
  • धने पुड - १ छोटा चमचा
  • हिंग -१/२ छोटा चमचा
  • हळद, मीठ
  • तेल -१ चमचा
  • तीळ -१ चमचा
  • तिखट -१ छोटा चमचा
१५ मिनिटे

  1. पालक धुऊन बारीक चिरून घ्यावा.
  2. वरील सर्व साहित्य एकत्र करून पीठ मळून घ्यावे.
  3. पोळीप्रमाणे लाटून भाजावे.
  4. भाजताना तेल, तूप किंवा बटर लावावे

 दही, ओली चटणी किंवा सॉस सोबत द्यावा. 

माझी ताई