मुळ्याचे पराठे

  • ३-४ मोठे मुळे, मीठ, ४-५ हिरव्या मिरच्या
  • तिखट, कोथिम्बिर,
  • गव्हाचे पीठ, पाणी, तूप
३० मिनिटे

गव्हाचे पिठामध्ये पाणी आणी मीठ घालून कणीक घट्ट मळून घ्यावी. थोड्या वेळ बाजूला ठेवून द्यावे.

३-४ मुळे चांगले खिसून घ्यावेत. खिसलेला मुळा चांगला घट्ट पिळून घ्यावा. आता ह्या मुळ्यात तिखट, कोथिंबीर, ४-५ हिरव्या मिरच्या घालून एकजीव करून घ्यावे.

ह्यानंतर कणिकेची छोटी पुरीसारखी लाट लाटून घ्यावी. ही लाट तळहातावर घेऊन मोदकासारखे सारण भरून घ्यावे. मग ही लाट हळूहळू लाटून घ्यावी. पराठ्यातून मिश्रण बाहेर येऊ नये ह्याची काळजी घ्यावी.

खोलगट लोखंडी तव्यात आधीच थोडेसे तूप लावून घ्यावे आणि पराठा खरपूस भाजून घ्यावा.

मुळ्याचे पराठे आंबट गोड दह्याबरोबर छान लागतात. हवे असल्यास जोडीला लोणचेही आहेच

पराठ्यातून मिश्रण बाहेर येत असल्यास २ पुरीसारख्या लाट लाटून मध्ये मुळ्याचे मिश्रण भरून घ्यावे.

आई