झटपट बीट परठा (लहान मुलान्साठी)

  • गव्हाचे पीठ, बेसनाचे पीठ,२ मोठी बीटे
  • कोथिम्बिर,तूप,जिरे,तिखट
  • हळद,४-५ हिरव्या मिरच्या,हिन्ग आणि चवीला मीठ
१५ मिनिटे
२-३

२ मोठी बिटे खिसून घ्यावीत.कोथिंबीर ही बारीक चिरून घ्यावी. आता साहित्यामध्ये लिहिलेले सगळे मिश्रण गव्हाचे पीठ, बेसनाचे पीठ एकत्र करावे.

छोटी पुरीसारखी लाट लाटून घ्यावी आणि खोलगट लोखंडी तव्यात आधीच थोडेसे तूप लावून घ्यावे आणि पराठा खरपूस भाजून घ्यावा.

बीट पराठे आंबट गोड दह्याबरोबर छान लागतात. रंग लाल  असला की मुले खूश असतात.

करून सांगा कसा झाला बेत ते

आई