कर्ण

कर्णाबद्दल कुणी कुणी काय काय वाचले आहे? त्या लेखकाने लिहिलेले काय काय आणि कसे वाटले आणि तुमचे स्वतः चे

कर्ण

ह्या व्यक्तिमत्वावर काय म्हणणे आहे????

मी म्रुत्युंजय हे पुस्तक ९ वेळा वाचले आहे.... आणि मी लेखकाच्या विचारांशी सहमत आहे....

त्या पुस्तकावर माझे नितांत प्रेम आहे.... ह्यामागे कारण म्हणजे लेखकाची अत्युच्च कोटीची भाषा...; विचार मांडण्याची पद्धत आणि कर्णाच्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगाचं केलेलं वर्णन.....त्याची प्रत्येक व्यथा ... त्याच्यावरचे अन्याय... आणि त्याची झालेली कुचंबणा मांडताना वापरलेला प्रत्येक शब्द...

मी भाषा प्रेमी आहे.... मुळात माझा व्यवसायही दुभाशाचा आहे.... मी जपनी भाषेचे काम करते... फोटोग्राफी करते

मी कविता करते, लेख लिहिते,कार्यक्रमांतून गाते, निवेदनं करते.... आणि साहित्यावर मनापासून प्रेम करते...

आणि म्हणुनच आयुश्यात एकदातरी प्रत्येक माणसाने "म्रुत्युंजय"वाचावं अस मला वाटतं......

तुम्हाला काय वाटतं????