किती दिसांनी मला भेटशी?

मूळ गजलः येथे वाचायला मिळेल.

भावानुवाद:

किती दिसांनी मला भेटशी?
कशी विचारांमधे हरवशी?...

सुसाट वारा मला विचारे
वाळूवरती काय गिरवशी?...

काय नेमके तुझ्यात आहे?
का मज इतकी सुंदर दिसशी?...

विरहाबद्दल नको पुसू मज
तुझे सांग, तू आहेस कशी?...

टीप: मूळ शायराचे नाव ठाऊक नाही; तसेच मूळ गजल छापील स्वरूपात समोर नाही. नाव/काही चुका जरूर कळवाव्यात.

(इतरभाषिक साहित्याचे भाषांतर मनोगतावर लिहिताना आपल्या लिखाणाचे शीर्षक मराठीतच असायला हवे. मूळ साहित्याचा फक्त दुवा किंवा संदर्भ द्यावा. ते साहित्य येथे संपूर्ण उतरवू नये. असे बदल आता केलेले आहेत.. : प्रशासक)