नोव्हेंबर १३ २००७

रागावल्या सखीशी.....

रागावल्या सखीशी मज वागता न आले
माझ्या मनातले ते मज सांगता न आले

नजरेतल्या विषाने पांगुळलो असा मी
धावावया निघालो मज रांगता न आले

आक्रंदनास माझ्या कारा अशी मिळाली
वेशीस दुःख माझे मज टांगता न आले

हा वेग या जगाचा मज पेललाच नाही
फुटलो उरी तरीही मज थांबता न आले

जगणे असेल माझे पण मालकी न माझी
मी संपतो म्हणालो मज संपता न आले


शेवटचे दोन शेर सुऱेख...
शेवटचे दोन शेर सुऱेख...
असेच
सहमत!
सहमत.
व्वा! बहोत खूब
वा
शरदराव, मनोगतावर स्वागत
वा!
फारच आवडली.
सुरेख.

Typing help hide