अश्या मुलांना कोण सावरेल सिगरेट,दारू का वाचनाची सवय

      आज चवथा दिवस माझा मित्र माझ्याकडे हाच प्रश्न विचारतो आहे ती अशी का वागते आहे? काय झाल काही माहित नाही फोन नाही मेसेज नाही मिस कॉल नाही.पाच दिवसा अगोदर प्रोबलेम आहे सांगितल होत.त्या दोघांच्या बाबतीत लिहायच झाल तर हा माझ्या सोबत कामाला आहे आणी ती कुवेतला काही दिवसासाठी गेली आहे.फोनच जास्त बिल येईल म्हणून दोघांच मेसेज आणि मिस कॉल द्यायच ठरल होत.प्रोबलेम काय तर तिकडे राहणाऱ्या एका मुलाने तिला आर्थिक मदत करून तिला लग्नाची मागणी घातली होती.हा हा हा या प्रोबलेम वर पण हसायला येईल पण मुलिंच हे वागण ईतक सोप नसत‌.त्याला समोर अस अस्वस्थ बघताना एका मागोमाग दुसरी सिगरेट लाईट करताना बघीतल्यावर कळतच नव्हत मन कोणाच जळतय त्याच की माझ‍.जणू माझ्याच मनात दडवून ठेवलेले प्रश्न तो मला विचारत होता ती अशी का वागते? वाचनाची आवड आणि न उलगडणाऱ्या या प्रश्नाकडे दुऱ्लक्ष करता करता दिड वर्षानंतर मी ही त्याच्या बरोबर या प्रश्नाची उत्तर शोधू लागलो होतो. तो बोलतच होता त्याचे प्रश्न संपतच नव्हते मी काय समजायच यार या सगळ्यात रात्र भर झोप नाही आठवड्याच्या शेवटी दोन बियर मारणार आणि झोपून जाणार त्याच हे सगळ वागण बोलण बघीतल्यावर मला ही वाटू लागल हा प्रश्न खरच गंभीर आहे पण याची उत्तर माझ्याकडे ही नव्हती.त्याच बोलण खुप झाल आता आता मी सेटल होणार भरपूर पेसा कमवणार.या सगळ्यावर बोलता बोलता मी बोलून गेलो अरे तू सेटल व्हायच्या मार्गावर आहेस अरे आपल वय २४ वयाच्या २६-२८ मध्ये लोक सेटल होतात.हे बोलल्या बोलल्या थोडयाफार प्रमाणात मला प्रश्नाचा उलगडा झाल्यासारखा वाटला आणि म्हणालो खुप कमी वयात आपण प्रेमाच्या भानगडीत पडलो रे.                                 मुळात मुलिंना लवकर समज येते त्यात ही हि गोष्ट सुद्धा येत असावी बहूतेक.मुल ही कायम त्याच दिवसात राहतात ते म्हणजे प्रेमालतले सुरवातीचे काही वर्ष. मुलींनेही कायम त्याच दिवसात राहाव अशी मुल अपेक्षा करतात.मुल ही तिच्याकडून न मिळणाऱ्या वेळेत भांडाभांड करून ते दिवस फुकट घालवतात अस वाटत.त्या वेळेत सिगरेटी फुंकत दारू पित बसण्यापेक्षा एखाद पुस्तक वाचून होईल एखादी नवीन माहिती मिळवावी अस वाटायला हव.मुलिंचा वेळ लग्नाअगोदर ही घर आणि नोकरी संभाळण्यात जातो.पण लग्नाच्या वेळी मुली सगळ्या बाजूने विचार करतात. काय होईल जर मित्राची प्रेयसी बोलली की माझ्या घरचे माझ्यावर त्या मुलाशी लग्न करण्याची जबरदस्ती करत आहेत मी तुझ्याशी लग्न करते घेउन जाशील तुझ्या घरी आत्ता मला लग्न करशील माझ्याशी आता.त्यावेळेस मुलाकडे काय असेल तिच्याबरोबर घालवलेले अगोदरचे क्षण की सध्या हे करण्याच्या परिस्थितीत नाही आहोत ही समज.