चांद मातला... लोकसत्ता आणि सचिन प्रतिक्रिया

आजच्या लोकसत्तेत छायाताईंच्या लेखाला 'सचिन ट्रॅव्हल्स' तर्फे उत्तर आले आहे. ते वाचल्यावर पुढील प्रश्न पडतात.

१. ही त्यांनी आयोजित केलेली खरोखरच पहिली सहल-मैफल होती का? असली तरी 'आम्ही इव्हेंट आयोजक' नाही असे म्हणून ते आपली जबाबदारी झटकू शकत नाहीत. तसेच केवळ माफी मागून यातून सुटू शकत नाहीत. हेच जर परदेशांत झाले असते तर ते त्यांना केवढ्याला पडले असते याचा त्यांनी विचार करावा.
२. कांही लोकांनी त्यांच्या बाजूने टाळ्या वाजवल्या म्हणून स्वतःला लोकप्रिय समजावे का ?
३. किती वर्षे धंदा केला यावर प्रामाणिकपणाचे मोजमाप होऊ शकते का?
४. पर्यटकांना आम्ही देव मानतो असे सर्वच सहल आयोजक (पैसे भरेपर्यंत) म्हणत असतात. छायाताईंवर आरोप करताना देव मानण्याच्या घोषणेला उथळपणाचा वास येत नाही का ?
५. आशाताईंबरोबर आणखी चार कार्यक्रम ठरवताना त्यांना झाल्या प्रकाराची प्रामाणिकपणे कल्पना दिली असेल का?
६. आशाताई मराठी पेपर वाचत असतील का?