विनोद

 मामंजी

संता वेड्यांच्या इस्पितळात दाखल होता. कोणामध्ये किती सुधारणा आहे, हे तपासण्यासाठी सर्व वेड्यांना एका हॉलमध्ये नेण्यात आले. डॉक्टर मनकवड्यांनी हॉलमधल्या फळ्यावर एका दरवाज्याचं चित्र काढलं आणि सर्वांना उद्देशून म्हणाले, ''चला, हॉलमधून बाहेर पडा.''

संता सोडून सगळ्या वेड्यांनी फळ्यावरच्या दाराजवळ गर्दी केली... त्यातून बाहेर पडण्यासाठी. संता मात्र बाकावर बसून त्यांच्याकडे पाहून हसत होता. अतिशय कौतुकाने डॉ. मनकवड्यांनी त्याला विचारलं, ''काय रे! तू का हसतोयस इथं बसून?''

'' हसू नको तर काय! पागलच आहेत हे सगळे,'' बंता हसू दाबून म्हणाला, ''अहो, इतकंही लक्षात येत नाहीये या वेड्यांच्या की दाराची किल्ली माझ्याकडे असताना बाहेर कसं पडता येईल यांना!!!!''

* * * * *

हसरा सुविचार

कधीही न करावीशी वाटणारी एक गोष्ट रोज करायचीच, असा नेम ठेवा...

... पुढे नोकरीत सोपे जाईल!!!!

(हा विनोद असाच जालावरून उचललेला आहे)