लेमन राईस

  • ३ लहान वाट्या तान्दुळ, तेल
  • जिरे, मोहोरी, हळद, लाल मिरच्या
  • शेन्ग्दाणे, काजु
  • चणा डाळ, उडीद दाळ
  • बारिक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, थोडा लसुण(चवीपुरता)
  • जास्त प्रमाणत लिम्बाचा रस, हवी असल्यास थोडी साखर
३० मिनिटे
४ लोक

सगळ्यात आधी तांदूळ धुऊन तो कमी पाणी घालून शिजवून घ्यावा, पाणी कमी घातल्याने भात फडफडीत होईल. भात करून घ्यावा.

भात जरा थंड झाला की हाताने तो मोकळा करावा.

नंतर पातेल्यात तेल गरम करायला ठेवावे, त्यात आधी मोहोरी टाकवी, मोहोरी तडतडल्यावर त्यात जिरे घालवे. मग २-४ लाल मिरच्या घालाव्या.

आधी शेंगदाणे परतून घ्यावेत आणी मग काजू टाकावेत. आवडत असल्यास थोडा लसूण बारीक करून घालवा.

मग दोन्ही डाळी टाकाव्यात,मस्त खमंग परतून घ्यावे,नंतर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालाव्यात आणी  हळद पण टाकावी.

जरा परतून जाले की लिंबाचा रस टाकावा, जर जास्त आंबट चालत असेल तर जस्त टाकावा.पण फार आंबट होणार नाही ह्याची काळजी घ्यावी.

आणी जरा वेळ ते सगळे असेच परतू द्यावे,त्यामुळे लिंबाचा आंबटपणा मुरतो,

आणि सगळ्यात शेवटी भात टाकावा,आणी हवी असेल तर साखर टाकावी,पण खरे ह्यात साखर टाकत नाहीत,कोथिंबीर बारीक चिरून टाकावी.थोडा वेळ परतू द्यावे.

हा भात नुसता खायला देखिल चांगला लागतो....आणी करायला वेळ पण कमी लागतो.

साखर आणि लसुण आवडत असल्यास घालावे. नाही घातले तरी चालतात.

मैत्रिण