विमा (इन्शुरन्स)

माझ्या कंपनीमध्ये अगदी अलीकडे तर्फे स्वास्थ्य आणि जीवनविषयक पूरक विम्याबद्दल (supplemental health and life insurance ) माहिती देण्यात आली. मला त्याबद्दल काही प्रश्न पडले होते. या निमित्ताने विम्याबद्दलच्या बर्‍या-वाईट गोष्टींची चर्चा इथे होऊ शकेल.

"एफ्लॅक" च्या "स्वास्थ्य-विषयक विम्यातील प्रकार :

१. व्यक्तिगत अपघात :

पूर्ण कुटुंबाचा वार्षिक हप्ता : सुमारे $३६५.
कव्हरेज : (मराठी शब्द ?) : रुग्णालयाच्या भेटी, रुग्णालयातील भरती , रुग्णालयातील वास्तव्य, ICU मधील वास्तव्य , नंतरच्या भेटी या सगळ्याचे मिळून सुमारे $२५०० (प्रत्येक व्यक्तीमागे)

२. रुग्णालयासंबंधीचा विमा : (क्र. १ आणि यातील फरक म्हणजे याच्यात अपघाताखेरीज इतर शस्त्रक्रिया आणि आजार येतात. )

पूर्ण कुटुंबाचा वार्षिक हप्ता : सुमारे $८००.
कव्हरेज : (मराठी शब्द ?) : रुग्णालयाच्या भेटी, रुग्णालयातील भरती , रुग्णालयातील वास्तव्य, ICU मधील वास्तव्य , नंतरच्या भेटी या सगळ्याचे मिळून सुमारे $२५०० (प्रत्येक व्यक्तीमागे)

३. कर्करोगविषयक :

पूर्ण कुटुंबाचा वार्षिक हप्ता : सुमारे $४००.
कव्हरेज : (मराठी शब्द ?) : रुग्णालयाच्या भेटी, रुग्णालयातील भरती , रुग्णालयातील वास्तव्य, ICU मधील वास्तव्य , नंतरच्या भेटी या सगळ्याचे मिळून सुमारे $१०,०००(प्रत्येक व्यक्तीमागे)

४. कर्करोगाखेरीज इतर रोगविषयक :

पूर्ण कुटुंबाचा वार्षिक हप्ता : सुमारे $४००.
कव्हरेज : (मराठी शब्द ?) : रुग्णालयाच्या भेटी, रुग्णालयातील भरती , रुग्णालयातील वास्तव्य, ICU मधील वास्तव्य , नंतरच्या भेटी या सगळ्याचे मिळून सुमारे $१०,०००(प्रत्येक व्यक्तीमागे)

"ऍफ्लॅक"चा जीवन-विमा आहे. त्याबद्दल मला माहिती नाही.

जीवन-विम्यामध्ये २ प्रकार दिसत आहेत.

१. टर्म लाईफ : विम्याचा महिन्याचा/वर्षाचा हप्ता भरा. त्याच्यातील एकही पैसा परत मिळणार नाही.
२. फुल-लाईफ : विम्याचा महिन्याचा हप्ता भरा ; साधारण १५ वर्षांनी तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचा परतावा मिळेल.

मी "मेट्-लाईफ" आणि "न्यूयॉर्क लाईफ" बद्दलची माहिती काढली. दोन्हीचे "भाव" साधारण सारखे आहेत :

१. टर्म् लाईफ :
महिन्याचा हप्ता : सुमारे $६०.
कव्हरेज : दहा लाख डॉलर्स

२. फुल लाईफ :
महिन्याचा हप्ता : सुमारे $२७५.
कव्हरेज : पाच लाख डॉलर्स

मी वरीलपैकी केवळ टर्म लाईफ घेतलेले आहे. बाकी प्रकारच्या विम्याबद्दल विचार करत आहे. याबद्दलचे तुमचे विचार जाणून घ्यायला आवडेल.

माझे आतापर्यंतचे विचार आणि काही प्रश्न :

१. तुम्हाला तुमच्या कंपनीतर्फे शॉर्ट टर्म, लाँग टर्म डिसेबिलीटी तर असतेच . मग ही "एफ्लॅक"ची भानगड का ? तर कारण ते लोक नगद रक्कम देतात. तुमच्या त्या त्या आजारात/अपघातात तुम्हाला नक्की किती पैसे मिळणार हे नक्की ठरलेले असते. नो क्वेश्चन्स् आस्कड् . तुमच्या कुटुंबातील कुणालाही काही झाले तरी हे पैसे मिळतात.

२. फुल-लाईफ ही चोर-गिरी वाटते. हप्ता खूप मोठा आहे. थोडी आकडेमोड केली तर मिळणारा परतावा काही फार मोठा नाही. पण मला वाटते, हे माहीत असूनही माझ्यासारखे बुद्दू लोक त्याकडे जातात कारण गुंतवणुकीतील त्यांना काही कळत नाही. आणि कुठेतरी शिस्तबद्ध रीत्या पैसे वाचवणे हा उद्देश असतो.

३. भारतातील विम्याबद्दलची परिस्थिती काय ? आता खाजगीकरणानंतर काही नवे चांगले पर्याय उपलब्ध आहेत का ? की LIC हाच सगळ्यात चांगला पर्याय आहे ?