कविता की गझल...?

साखीच्या मुखी कोणता भाव आहे?
मिठीला मला का अता वाव आहे...?

तिला काय सांगू मनी कोण माझ्या?
सखी सांगते की तिला ठाव आहे...!

फकीही जरी लावली कावळ्याने,
तरी जाणतो तो गळीं 'काव' आहे!

तुझ्याशी सुरू वाट संपे तुझ्याशी,
मियांची मशीदी जणू धाव आहे!

नको तो पिझ्झा ना मला प्रेम त्याचे,
पुणेरी भुकेला वडा-पाव आहे!

गुन्हा शोधण्याला नको ते पुरावे,
जिथे वेदनांच्या मुखी नाव आहे!