डिसेंबर
७
२००७
नसतात पाहण्याचे, नसतात सांगण्याचे
हे घाव अंतरीचे असतात झेलण्याचे
खोली कशी कळावी सांगून कोरड्यांना
असतात प्रेमसागर हे आप पोहण्याचे
होऊ नकोस मुग्धा ऐकून गीत माझे
कविता निमित्त आहे संवाद साधण्याचे
जळणे कठीण नसते ज्योतीवरी, पतंगा
असतात प्रश्न अवघड नाते निभावण्याचे
नाते कसे लपावे नजरेतुनी जगाच्या ?
उरले न भान अंतर दोघात राखण्याचे
चुपचाप तेवणारी ज्योतीच दु:ख जाणे
दिनरात प्रियकरांना बाहूत जाळण्याचे
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
छान..
प्रे. मनीषा२४ (शुक्र., ०७/१२/२००७ - ०९:१८).
व्वाव्वा!!
प्रे. चक्रपाणि (शुक्र., ०७/१२/२००७ - ०९:२६).
व!!
प्रे. केशवसुमार (शुक्र., ०७/१२/२००७ - ०९:४६).
वा!
प्रे. अजब (शुक्र., ०७/१२/२००७ - १०:०९).
छान...
प्रे. प्रदीप कुलकर्णी (शुक्र., ०७/१२/२००७ - १२:१६).
१,३,४
प्रे. प्रियाली (शुक्र., ०७/१२/२००७ - १३:०५).
वा!
प्रे. चित्त (शुक्र., ०७/१२/२००७ - १३:१२).
वा!
प्रे. रोहिणी (शुक्र., ०७/१२/२००७ - १४:१७).
वा!
प्रे. पुलस्ति (शनि., ०८/१२/२००७ - ०२:५०).
सुंदर गझल !
प्रे. सतीश वाघमारे (शनि., ०८/१२/२००७ - १५:०३).
वा! वा!
प्रे. विसुनाना (मंगळ., ११/१२/२००७ - १३:५१).
मतलाच..
प्रे. कामिनी केंभावी (रवि., ३०/१२/२००७ - १८:०८).