सवाई गंधर्व संगीत महोत्सवात पंडित भीमसेन जोशी

पुण्यातील सवाई गंधर्व संगीत महोत्सव यंदा आगळावेगळा ठरला. रविवारी चक्क "स्वरभास्कर' पंडित भीमसेन जोशी यांनी आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. या संदर्भात ई-सकाळने केलेले ऑडिओ आणि व्हिडिओ समस्त मनोगतींना खालील लिंकवर पाहता येतील.

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा
ऑडिओ ऐकण्यासाठी इथे क्‍लिक करा
ऑडिओ ऐकण्यासाठी इथे क्‍लिक करा

किंवा

http://www.esakal.com/features/bhimsen/index.html

http://www.esakal.com/features/bhimsen1/temp_audio.html

http://www.esakal.com/features/bhimsen2/temp_audio.html

प्रकृतिअस्वास्थ्यामुळे गेली चार वर्षे हजारो रसिकांप्रमाणेच "सवाई'चा स्वरमंचही "भीमसेनी' सुरांपासून वंचित राहिला होता. त्या स्वरमंचाची "प्रतीक्षा' आज संपली आणि साऱ्यांच्याच श्रुती धन्य होऊन गेल्या. भारावलेल्या वातावरणात किराना घराण्याचा खास राग मानल्या जाणाऱ्या "मुलतानी' रागातील "गोकुल गॉंव का छोरा' या विलंबित एकतालातील पारंपरिक प्रसिद्ध ख्यालाला पंडितजींनी प्रारंभ केला. ते अगदी मोजके गायले; पण रसिकांना त्यांनी घराणेदार सुरांचा अभिजात अनुभव दिला. रागरूप नेमके दर्शवणाऱ्या स्वरावली, आत्मविश्‍वास आणि स्वरलीन मुद्रा, असे देखणे चित्र स्वरमंचावर होते.

पाठोपाठ "कंगन मुंदरियॉं' ही त्रितालातील रचना सादर करून "अवघाचि संसार सुखाचा करीन' या अभंगाला त्यांनी प्रारंभ केला आणि "रस के भरे तोरे नैन' या भैरवी ठुमरीने सांगता केली. भरत कामत (तबला) आणि सुधीर नायक (हार्मोनिअम), माऊली टाकळकर (टाळ) यांनी त्यांना साथ केली. श्रीनिवास जोशी, आनंद भाटे, माधव गुडी, राजेंद्र कंदलगावकर यांनी स्वरसाथ केली. या वेळी पंडितजींची शुश्रूषा करणाऱ्या मधुरा सोवनी यांचा सत्कार पंडितजींच्या हस्ते करण्यात आला. टाकळकर यांचाही अमृत महोत्सवानिमित्त पंडितजींनी सत्कार केला.

स्वरसोहळा अनुभवण्यासाठी...
[float=font:samataB;place:top;]पं. भीमसेन जोशी गाणार, असे जाहीर झाल्या झाल्या उपस्थित गानरसिकांमध्ये जणू चैतन्याची लहर उसळली.[/float] हे अमूल्य क्षण आपल्याबरोबरच आपले आप्तेष्ट, मित्र-मैत्रिणी यांनीही चुकवू नयेत, म्हणून मग सुरू झाली फोनाफोनी! गर्दीतील अनेक कानांना मोबाईल लागले, तर काहींची बोटे "एसएमएस' टाइप करू लागली. उद्देश एकच-पं. भीमसेन गाणार आहेत, याची माहिती पोचवणे. ही बातमी पसरताच बघता बघता दुपारी एकच्या सुमारास संपूर्ण मंडप भरून गेला. मंडपात जागा मिळाली नाही, म्हणून काही जण बाहेर उन्हात उभे होते. या गर्दीमध्ये अक्षरशः आबालवृद्धांची उपस्थिती होती आणि सर्व डोळे आसुसले होते स्वरभास्कराची गानमुद्रा पाहण्यासाठी!

संदर्भाच्या बातमीसाठी दिनांक 10 डिसेंबरचा ई-सकाळ चा अंक बघता येईल. आपल्याला हे पाहून काय वाटले ते अवश्‍य कळवा.