विनोद नक्की कोणाचे ?

नमस्कार,

दोन विनोद आहेत. 
1. एका माणसाला रस्त्यात गाढव मरून पडलेले दिसते. तो ताबडतोब महानगरपालिकेला फोन करतो. तिकडून उत्तर येते," अहो, अशी बातमी आधी नातेवाईकांना कळवायची असते".
तो माणूस म्हणतो," म्हणूनच तुम्हाला फोन केला".
2. एक अंत्ययात्रा निघालेली असते. यात्रेत नसलेल्या माणसाचा धक्का लागून प्रेत खाली पडते. यात्रेत सामील असलेलेली माणसे लगेच त्या माणसाच्या अंगावर धावून येतात व वादावादी करू लागतात. तो माणूस म्हणतो," अहो, जो खाली पडला आहे तो काहीच बोलत नाही. तुम्ही कशाला आरडाओरडा करत आहात ?" 
हे विनोद मी लहानपणापासून साधे म्हणून ऐकलेले आहेत. त्याचबरोबर आचार्य अत्र्यांनी केलेले म्हणूनही ऐकलेले आहेत. म्हणजे, पहिल्या विनोदात फोन करणारा माणूस म्हणजे अत्रे. दुस-यात ज्याचा धक्का लागला तो माणूस म्हणजे अत्रे.

खरोखरीच, हे अत्र्यांनी केलेले विनोद आहेत की त्यांच्या नावावर सांगितले (खपवले! ) जात आहेत ?