वाटाण्याचा पराठा

  • २०० ग्रॅम वाटाण्याचे दाणे
  • ४/५ हिरव्या मिरच्या
  • कोथिंबीर
  • आले-लसूण यांची पेस्ट
  • जीरे, तेल, मीठ
  • २५० ग्रॅम कणीक
३० मिनिटे
४ व्यक्ती
  • प्रथम वाटाण्याचे दाणे, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर मिक्सरमधून जाडसर काढून घ्याव्यात.
  • एक पॅन मध्ये २ चमचे तेल घेवून जीरे, आले-लसूण पेस्ट टाकावे.
  • नंतर वाटाण्याचे जाडसर मिश्रण त्यात टाकावे. एक वाफ आणून घ्यावी.
  • कणकेत मीठ टाकून नेहेमीच्या पोळीसारखे भिजवावे. कणकेचे गोळे करून वरील मिश्रण त्यात भरून पराठ्यासारखे लाटावे.
  • तेल टाकून तांबूस रंग येईपर्यंत परठा शेकावा.
  • सॉस सोबत खायला द्यावा.

याच पद्धतीने थोडा बदल करून वाटाण्याच्या कचोऱ्याही करता येतात.

माझी आई