हिरवागार कबाब

  • २ उक्ड्लेले बटाटे, ६ पालकाची पाने,१ मूठ भर मटार,
  • थोडेसे आले- लसुन पेस्ट, चवीनुसार मीठ, चिमुठ भर साखर,कोथीबीर,
  • अरधी वाटी ब्रेड क्र्म्स, आणी ४-५ हीरव्या मीरच्या
३० मिनिटे
३ जण

आधी बटाटे उकडून त्याची साले काढून घ्यावी. मग पालकाची  पाने आणि मटार दोन्ही कुकर मधून कढून स्म्यश करून घेणे. हिरवी मीरची मीक्सर मधून बारीक करून ठेवणे. नंतर ऐक मोठे भान्डे घेउन त्या मध्ये   उक्ड्लेले बटाटे, पालकाची पाने, मूठ भर मटार  , ४-५ हीरव्या मीरच्या असे सग्ळे साहीत्य ऐकत्र  करणे. त्या मध्ये मग  थोडेसे आले- लसुन पेस्ट, १/२ वाटी ब्रेड क्र्म्स, कोथीबीर आणि चवीनुसार मीठ    आणि  साखर घालणे. जसा कणकेचा गोळा तयार होतो तसा व्हायला पाहीजे. जर थोडा सैल  वाटला तर त्यामधे थोडे   ब्रेड क्र्म्स घालावे. मग छोटे  छोटे  गोळे घेउन  त्याला  अंडाकृती आकार देउन तळावे. हे कबाब गरम गरम खावे.

खीसलेला कांदा,गाजर, कोबी  असला तर कबाब वर डेकोरेशन साठी घालणे.  

आई