शैक्षणिकदृष्ट्या माहिती हवी आहे!

मला पुण्यातील काही शैक्षणिक संस्थांची आणि त्यांच्या अभ्यासक्रमांची माहिती हवी आहे. बीएससी नंतर एचआर अथवा ऍडमिनिस्ट्रेशन मधील शिक्षण घेण्यासाठी पुण्यात कोणत्या शैक्षणिक संस्था आहेत? त्यांचे अभ्यासक्रम कधी सुरू होतात तसेच त्यांचा कालावधी व फी किती आहे? जानेवारी ते मार्च ह्या काळात कुठे प्रवेश सुरू होतो का?

ह्याबद्दलची माहिती मला कुठल्या संकेतस्थळावर मिळेल? माझ्या कोल्हापूर मधील मैत्रीणीला ह्यामध्ये शिक्षण घेऊन नोकरी करायची आहे.