ओल्या खोबऱ्याची लाल चटणी

  • अर्धा नारळ खोवून घेतलेला. ६-७ लसूण पाकळ्या, ६-७ सुक्या लाल मिरच्या ( गरम पाण्यात एक तास भिजवून )
  • मीठ, चिंच अथवा लिंबू चवीप्रमाणे. सुक्या खोबऱ्याचा दिड इंच लांबीचा तुकडा भाजून घेतलेला.
१५ मिनिटे
३-४ जणांसाठी

सगळे जिन्नस एकत्र करून मिक्सर मध्ये चटणी वाटावी. शक्यतो वाटताना पाणी घालू नये. भाकरीबरोबर फार छान लागते.

लाल मिरच्यांऐवजी तिखट सुद्धा वापरता येते.

आई