आवळ्याची चटणी

  • २ मोठे आवळे (बिया काढून)
  • १ वाटी किसलेले ओले खोबरे
  • अर्धी वाटी कोथींबीर, २-३ हिरव्या मिरच्या, ७-८ पाकळ्या लसूण
  • साखार, मीठ (चवीनुसार)
  • जिरे, मोहरी, तेल (फोडणी साठी)
१५ मिनिटे

प्रथम आवळे (बिया काढून), ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, साखार व मीठ (चवीप्रमाणे) हे सर्व जिन्नस मिक्सर मध्ये थोडे पाणी टाकून वाटून घ्यावेत.    

नंतर तेलात जिरे, मोहरी यांची फोडणी करून ती वरील वाटणात ओतावी व चटणी सारखी करून घ्यावी.

ही चटणी करण्यास अतीशय सोपी आहे व आवळ्यामूळे चवही वेगळी लागते.

हिरव्या मिरच्यांएवजी लाल मिरच्या सुद्धा घालू शकता.

मैत्रीण