लावलेला पोह्याचा चिवडा

  • पोहे ३ वाटी, तेल ४ मोठे चमचे , ६ मोठे चमचे मेतकुट,
  • लाल तिखट २ चमचे, हळ्द २ चमचे, डाळवे २ चमचे,
  • मीठ आणि साखर चवीनूसार.
१५ मिनिटे
३ जणी

१) प्रथम एका कढईत  ३  वाटी  पोहे तेल न घालता नूसते भाजून घ्यावे.पोहे कूरकूरीत झाले पाहीजे. 

२) भाजून  झाल्यावर एका मोठ्या पातेलात  पोहे काढून  घ्यावे.

३) गरम गरम  पोह्यातच मेतकुट, लाल तिखट, हळद, मीठ ,साखर चवीनूसार घालणे आणि पोहे  एक्तत्रित कालवून घेणे.

४) नंतर ग्यासवर कढईत  तेल  तापायला ठेवणे.

५) तेल  ताप्ल्यावर त्याच्यात डाळवे टाकणे आणि ५ मिनीटे तेल गार होण्यासाठी ठेउन देणे.

६) तेल गार झाले की पोह्यावर ओतून देणे आणि सगळे एक्तत्रित कालवून घेणे.

  • जर घरी कडीपत्याची चटणी असेल तर जरुर लावलेला पोह्यात घालावी. 
मम्मा (माझी आई)