आय.टी. क्षेत्रावर संकटाची गडद छाया!

एक, दोन नव्हे तर तब्बल पाच सॉफ्टवेअर कंपन्यांनी २००७ या वर्षी आणि २००८ च्या सुरुवातीला ५०० /२००० कर्मचाऱ्यांना आणि तेही एकाच वेळेस ले ऑफ (कामावरून काढून टाकणे) देण्यात आले आहे. कारण असे सांगत आहेत की त्यांची मागील वर्षी कामगिरी चांगली नव्हती. त्यातील काहींना त्यांच्या बायोडाटा मधील कौशल्यांना साजेसा प्रोजेक्ट कंपनीत नसल्याने ते बरेच महिने रिकामे होते.त्याला बेंच / बफर असे नाव आहे. त्यामुळे त्यांना दुसरा जॉब शोधायला सांगण्यात आला आणि राजीनामा देण्यास सांगितले. आणि आता आय.टी क्षेत्रात पगारवाढही होणार नाही. पगारवाढ नको पण कमीत कमी आम्हाला तरी कामावर राहू द्या असे आता कर्मचाऱ्यांना म्हणण्याची पाळी आलेली आहे असे ऐकले. ही नक्कीच चिंताजनक परिस्थिती आहे. या संबंधीत एक प्रातिनिधीक बातमी चा दुवा खाली देत आहे.

दुवा क्र. १

गुगल वर 'आय.टी. जॉब कट ले ऑफ' असे शोधा म्हणजे आपल्याला या परिस्थितीची कल्पना येईल.

यामागची वेगवेगळी कारणे कानावर येत आहेत ती अशीः

  • डॉलरची घसरण
  • शेअर बाजारातील घसरण
  • सगळ्या आय.टी. कंपन्यांना या दोन्ही वर्षी झालेला तोटा.
  • जागतिक / अमेरिकेतील मंदी
  • फक्त उच्च दर्जाची क्षमता असणारेच कर्मचारी कंपनीत राहातील त्यामुळे कंपनीचा दर्जा चांगला राहील

आता प्रश्न असा समोर उभा राहील की या सर्व कर्मचाऱ्यांचे काय? ज्यांनी आधी खुप कमावून घेतले असेल त्यांचे ठीक आहे पण ज्यांना खरोखर नोकरीची गरज आहे, ज्यांचे बस्तान अजून नीटसे बसलेले नाही त्यांचे काय होईल? आय.टी. वगळता इतर कोणत्या क्षेत्रात या सगळ्यांना काम मिळू शकेल? एकदम इतके हजारोंच्या संख्येने कर्मचारी काढणे योग्य आहे का?

आय.टी. म्हणजे लठ्ठ पगार असे समीकरण आता चुकीचे असून आता आय.टी. म्हणजे डोक्यावर टांगती तलवार असे समीकरण झाले आहे.

ते असो पण एक मात्र नक्की की या भयंकर परिस्थितीमुळे आय.टी. क्षेत्रावर संकटाची गडद छाया मात्र पसरली आहे.